Posts

संवाद - १

मी कोण..? आत्तापर्यंत काय केलं…?? कसा जगलो..??? आज मागे वळून बघताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते; मी आत्तापर्यंत शिडाच्या होडीसारखं जगलो. जिकडे काळाचा वारा नेत गेला तिकडे मी जात गेलो. काही मिळवण्यासाठी प्रवाहाविरुद्ध तर सोडाच पण प्रवाहाच्या दिशेतसुद्धा मी काही विशेष प्रयत्न केलेले मला आठवत नाहीत. याला माझा स्थायीभावच जबाबदार असेल कदाचित. पण हे मात्र खरं की आजपर्यंत एखादी गोष्ट हवीच म्हणून मन कधी ईर्ष्येला पेटलंच नाही..ते सदोदित धुमसतंच राहिलं..आणि तसंच एक दिवस विझेलही..! आजपर्यंत जे जे मिळत गेलं ते ते घेत गेलो. जे नाही मिळालं ते मिळवण्याची आसही नाही बाळगली ! ना आजपर्यंत कुठच्या गोष्टीचा अट्टहास धरला, ना कुठची गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष केला. किंबहुना मला तर वाटतं बंड माझ्या पिंडातच नाही. अशा गोष्टी काही सवयीने किंवा मुद्दाम विकसित करून येत नाहीत. त्या रक्तात असायला लागतात. ’बंड’- अन्याया विरुद्ध, प्रवृत्ती विरुद्ध अथवा विचारशाही विरुद्ध  ही आतमधून येतात; उत्स्फूर्तपणे! त्याच्यासाठी ना वैचारिक प्रगल्भता लागते ना सदसद्विवेकबुद्धी! लागते ती फक्त प्रबळ जिद्द आणि इच्छाशक्ती! मी ...

मी माझा !

आत्तापर्यंत खूप वेळा मनात असे काही विचार आले. वाटलं हे कुठेतरी लिहून काढावेत. उरल्या आयुष्यात...फावल्या वेळात...कधीकाळी वाचायला गंमत वाटेल ! तसा आयुष्यातला क्षण अन् क्षण विस्तृतपणे कोणाजवळ घडाघडा बोलून टाकावा असं वाटलंच नाही किंबहुना तितक्या जवळ कुणी आलंच नाही..! त्याचमुळे असेल कदाचित...पण हा विचार मनामध्ये पुष्कळ वेळा आला..! आज या विचारांचं अनुकरण करताना मनाच्या कुठल्याशा एका कोपऱ्यात ’मी’ च्या लहानशा बीजाला नकळत अंकुर फुटलेला जाणवतोय!        ही काही तशी रोजनिशी नव्हे, दररोज केलं काय..कमावलं काय आणि गमावलं काय याचा हिशेब ठेवायला..  किंवा आनंद आणि दु:ख याचे उहापोहसुद्धा यात नसावेत. हे प्रतिबिंब आह, माझ्या विचारांचं...माझ्यातल्या ’मी’ पणाचं..!        हे एक माध्यम आहे...मीच मला ओळखण्यासाठी निर्माण केलेलं. सगळी तात्कालिक  बंधन झुगारून; मग ती सामाजिक असतील, नैतिक असतील, कौटुंबिक असतील, भाषिक असतील वा इतर कुठल्याही प्रकारची..! ही सगळी बंधनं झुगारून मी करणाऱ्या विचारांचा हा मागोवा आहे. अगदी प्रामाणिक आणि स्वयंस्फूर्त..! को...