मी माझा !
आत्तापर्यंत खूप वेळा मनात असे काही विचार आले. वाटलं हे कुठेतरी लिहून काढावेत. उरल्या आयुष्यात...फावल्या वेळात...कधीकाळी वाचायला गंमत वाटेल ! तसा आयुष्यातला क्षण अन् क्षण विस्तृतपणे कोणाजवळ घडाघडा बोलून टाकावा असं वाटलंच नाही किंबहुना तितक्या जवळ कुणी आलंच नाही..! त्याचमुळे असेल कदाचित...पण हा विचार मनामध्ये पुष्कळ वेळा आला..! आज या विचारांचं अनुकरण करताना मनाच्या कुठल्याशा एका कोपऱ्यात ’मी’ च्या लहानशा बीजाला नकळत अंकुर फुटलेला जाणवतोय!
ही काही तशी रोजनिशी नव्हे, दररोज केलं काय..कमावलं काय आणि गमावलं काय याचा हिशेब ठेवायला.. किंवा आनंद आणि दु:ख याचे उहापोहसुद्धा यात नसावेत. हे प्रतिबिंब आह, माझ्या विचारांचं...माझ्यातल्या ’मी’ पणाचं..!
हे एक माध्यम आहे...मीच मला ओळखण्यासाठी निर्माण केलेलं. सगळी तात्कालिक बंधन झुगारून; मग ती सामाजिक असतील, नैतिक असतील, कौटुंबिक असतील, भाषिक असतील वा इतर कुठल्याही प्रकारची..! ही सगळी बंधनं झुगारून मी करणाऱ्या विचारांचा हा मागोवा आहे. अगदी प्रामाणिक आणि स्वयंस्फूर्त..! कोणाचाही मुलाहिजा न बाळगता... कुठल्याही मर्यादांमध्ये अडकून न राहता...मी स्वतः:शी साधलेला हा एक......’संवाद’ आहे!

Comments
Post a Comment